लहान मुलांच्या खोलीला योग्य रंग लावणे खूप गरजेचे आहे.
अनेक संशोधनात असे समोर आले आहे की वेगवेगळ्या रंग छटांचे बालमनावर विविध परिणाम होऊ शकतात.
काही रंग असे आहेत ज्यांना मुलांच्या रूममध्ये लावल्याने त्यांच्या मनावर मोठे परिणाम होऊ शकतात.
गडद नीळ रंग मुलांच्या खोलीला कधीच लावू नये. यामुळे रात्री जास्त काळोखात मुलांना भीती वाटू शकते.
जांभळ्या रंगामुळेदेखील तीच समस्या उद्भवते. त्यामुळे तुम्ही जांभळा रंग लावण्याऐवजी लेवेंडर कलर वापरू शकता.
असे सांगितले जाते की लाल रंगाने मुले आक्रमक बनतात किंवा चिडचिड करू लागतात.
मुलांच्या खोलीच्या भिंतीवर सौम्य आणि हलके रंग लावा.
त्याशिवाय तुम्ही मुलांच्या खोलीतील भिंतींवर कार्टून किंवा काही अभ्यासाची चित्रे रंगवू शकता.
(Disclaimer: इथे देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित आहे. याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)