अनेकजण जिममध्ये व्यायाम करताना किंवा मॉर्निंग वॉक करताना फेस मास्कचा वापर करतात.
मात्र, व्यायाम करताना मास्कचा वापर कितपत योग्य आहे? जाणून घ्या.
व्यायाम करताना एका मर्यादित वेळेपर्यंत मास्क लावणे हे योग्य आणि गरजेचे आहे. परंतु, अधिक वेळेपर्यंत मास्कचा वापर करणे हे शरीरासाठी धोकादायक ठरु शकते.
तज्ज्ञांच्या मते, जास्त काळ मास्क घातल्याने शरीरातील ऑक्सिजनची पातळी कमी होऊ शकते.
मॉर्निंग वॉक किंवा व्यायाम करतेवेळी श्वास घेण्याचा वेग वाढतो आणि दम लागल्याचे जाणवू लागते.
यादरम्यान शरीराला जास्त ऑक्सिजनची गरज भासते. परंतु, मास्कमुळे पुरेशा प्रमाणात ऑक्सिजन मिळू शकत नाही.
व्यायाम करतेवेळी मास्कची जास्तच गरज भासत असेल तर तुम्ही एन95 मास्कचा वापर करु शकता.
(Disclaimer: इथे देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित आहे. याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)