'प्राजक्ताला तोड नाही', अभिनेत्रीच्या काळ्या साडीमधील फोटोंनी चाहत्यांना लावलं वेड

Soneshwar Patil
Feb 11,2025


मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे सोशल मीडियावर चर्चेत असते.


नुकतीच अभिनेत्री महाकुंभमेळ्यात पोहोचली होती. तेथे पवित्र स्नान केल्यानंतर अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला होता.


अशातच आता प्राजक्ता माळीने इन्स्टाग्रामवर काळ्या रंगाच्या साडीमधील फोटो शेअर केले आहेत.


तिच्या या फोटोंनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातलाय. चाहत्यांना तिचा हा लूक खूपच आवडला आहे.


अभिनेत्रीच्या फोटोंवर चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केलाय. एकाने 'प्राजक्ता माळीला तोड नाही' अशी कमेंट केली आहे.


तिच्या या लुकने चाहत्यांना वेड लावलं आहे. सोशल मीडियावर प्राजक्ताचे लाखो चाहते आहेत.

VIEW ALL

Read Next Story