भारतातील एकमेव जिल्हा जो दोन देशांनी वेढलाय, जिथून पायी चालत परदेशात जाता येतं

Pooja Pawar
Feb 09,2025


भारतातील प्रत्येक राज्य, जिल्हा आणि शहराला आपला वेगळा इतिहास आणि संस्कृती आहे. प्रत्येक मैलावर येथील खाद्य संस्कृती आणि भाषा बदलते.


देशात एकूण 28 राज्य असून 8 केंद्रशासित प्रदेश आहेत. ज्यात 797 जिल्हे आहेत.


पण तुम्हाला माहितीये का की देशात असा एकमेव जिल्हा आहे जो दोन देशांनी वेढलाय.


तसेच यातील खास गोष्ट अशी की जिथून तुम्ही पायी परदेशात जाऊ शकता.


बिहारचा किशनगंज जिल्हा हा दोन देशांनी वेढलेला आहे.


बिहारचा किशनगंज जिल्हा नेपाळ आणि बांगलादेशला लागून आहे. या जिल्ह्याला कृष्णकुंज असे देखील म्हणतात.


किशनगंज हा पूर्व बिहारमध्ये असलेला छोटासा जिल्हा असून 2011 मध्ये झालेल्या जनगणनेनुसार या जिल्ह्यात 800 गावं आहेत एकूण लोकसंख्या 16,90,400 इतकी आहे.

VIEW ALL

Read Next Story