भारतीय बाजारपेठेत अनेक इलेक्ट्रिक कार लॉन्च होत आहेत. या कारची मागणी देखील वाढत आहे.
जानेवारीमध्ये इंडिया मोबिलिटी ग्लोबल एक्सपोने अशीच एक कार लॉन्च केली आहे. जी देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार आहे.
Eva कार बॅटरी सबस्क्रिप्शन आणि अमर्यादित किलोमीटर या दोन मॉडेल्समध्ये उपलब्ध आहे.
Eva ही कार बाजारात तीन प्रकारांमध्ये लॉन्च करण्यात आली आहे. ज्यामध्ये Nova, Stella आणि Vega.
Eva कारची एक्स शोरुम किंमत 3.25 लाखांपासून ते 4.49 लाख रुपयांपर्यंत आहे. यामध्ये दोन लोक एक मुलगा असे प्रवास करू शकता.
Eva च्या बेस मॉडलची रेंज 124 किलोमीटर, मिड-वेरिएंटची रेंज 175 किलोमीटर आणि टॉप वेरिएंटची रेंज 250 किलोमीटर इतकी आहे.