आठवड्यातून दोन ते तीन वेळा केसं धुणं गरजेचं असतं. अन्यथा केसांमध्ये कोंडा, दुर्गंधी इत्यादी समस्या निर्माण होतात.
अंड्यामध्ये प्रोटीन, व्हिटॅमिन आणि बायोटिन असतं ज्यामुळे केसांना मजबुती मिळते.
अंड आठवड्यातून दोन वेळा केसांना लावलं पाहिजे, यामुळे केसांची मूळ स्ट्रॉंग होतात.
केस गळती कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी देखील तुम्ही केसांवर अंड लावू शकता.
फ्रिजी हेअर्स किंवा रफ झालेल्या केसांवर देखील तुम्ही 2 अंड्याचा मास्क लावू शकता.
अंड्यातील पिवळा भाग बाजूला काढून खोबरेल तेलात मिसळून हाताने किंवा ब्रशने केसांवर लावू शकता.
(इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. आपण कोणत्याही पदार्थाचा केसांवर वापर करण्यापूर्वी डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)