'ही' आहेत जगातील सर्वात महागडी चॉकलेट्स, किंमत ऐकून बसेल धक्का

तेजश्री गायकवाड
Feb 09,2025


व्हॅलेंटाईन वीकच्या तिसऱ्या दिवशी चॉकलेट डे साजरा केला जातो.


यानिमित्ताने जाणून घेऊयात जगातील सर्वात महागडी चॉकलेट्स कोणती आहेत.

DeLafées गोल्ड चॉकलेट

महागड्या चॉकलेट्सच्या यादीत हे चॉकलेट तिसऱ्या क्रमांकावर आहे. हे चॉकलेट स्विस सोन्याच्या नाण्यासह येते. एका बॉक्समध्ये 8 चॉकलेट्स असतात.


या चॉकलेट्ससोबत 24 कॅरेट सोन्याचे नाणेही देण्यात आले आहे. याची किंमत 33 हजार रुपये आहे.

Debauve आणि Gallais Le livre चॉकलेट

हे फ्रेंच चॉकलेट आहे जे सोन्याचा मुलामा असलेल्या बॉक्समध्ये पॅक केलेले असते. या बॉक्समध्ये 35 चॉकलेट्स असतात जी एक एक करून हाताने तयार केली जातात.


35 चॉकलेट्स असलेल्या या बॉक्सची किंमत 46 हजार रुपये आहे. हे एका लहान बॉक्समध्ये देखील येते. ज्यामध्ये 12 चॉकलेट्स आहेत. त्याची किंमत 28 हजार आहे.

La Madeline au Truffe चॉकलेट

या चॉकलेटचे नाव सर्वात महागड्या यादीत आहे. या चॉकलेटची निर्मिती निप्सचिल्ड नावाच्या कंपनीने केली आहे. हे फक्त ऑर्डरनुसार तयार करून दिले जाते.


त्याची डिलिव्हरी 14 दिवसांनी होते. हे दुर्मिळ मशरूमपासून बनवले जाते, ज्याची किंमत 80 ते 85 हजार आहे.

Toak चॉकलेट

हे जगातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात महागडे चॉकलेट आहे. याची किंमत 20 ते 20 हजार रुपये आहे. विशेष म्हणजे हे चॉकलेट 50 ग्रॅमच्या बारमध्ये येते.

VIEW ALL

Read Next Story