डोसा दक्षिणात्य पदार्थ असला तरी भारतात मोठ्या प्रमाणात बनवला आणि अगदी आवडीने खाल्ला जातो.
मात्र, आवडीचा खाद्यपदार्थ असला तरी अनेकदा डोसा बनवताना त्याचे बॅटर तव्यावर चिकटते आणि हवे तसे बनत नाही.
अशावेळी डोस्याचे बॅटर तव्यावर न चिकटता अगदी हवे तसे बनण्यासाठी 'या' टीप्स नक्की फॉलो करा.
सगळ्यात आधी तवा व्यवस्थित स्वच्छ करुन चांगल्यारितीने पुसून घ्या. यावेळी पाण्याचा अजिबात वापर करु नका.
आता गॅसवर तवा मंद आचेवर ठेवा. यानंतर तव्यावर थोडे तेल टाका आणि तेल गरम झाल्यानंतर तव्यावर थोडे पाणी शिंपडून पुन्हा योग्यरित्या पुसून घ्या. यामुळे डोसा तव्यावर चिकटणार नाही.
तसेच, तव्यावर थोडे पाणी शिंपडून लगेच तव्यावर डोस्याचे बॅटर पसरवून डोसे बनवू शकता.
याव्यतिरिक्त, तव्याला जास्त आचेवर गरम करुन घेऊन नंतर गॅसची आच मंद करुन डोस्याचे बॅटर टाकल्याने बॅटर तव्याला चिकटणार नाही.