प्रवासाकडे कल असणारी बरीच मंडळी तुमच्या ओळखीत असतील. किंबहुना तुमच्यापैकीही कित्येकांना प्रवासाची आवड असेल.
धकाधकीच्या जीवनातून निवांत क्षणांची अनुभूती देतो तोच हा प्रवास. पण, प्रवासामध्ये जेव्हा खर्चाचा विषय येतो तेव्हा मात्र काही मंडळी एक पाऊल मागे येतात.
आता मात्र तसं होणार नाही. कारण, तुम्ही हिमाचल प्रदेशातील कसोल, तोष किंवा डलहौसी ही ठिकाणं अवघ्या 7 हजारांमध्ये फिरून येऊ शकता.
उत्तराखंडमधील 'फुलों की घाटी' आणि शिमल्यातील काही भागांनाही तुम्ही 7 हजारांच्या बजेटमध्ये भेट देऊ शकता.
हरिद्वार, ऋषीकेश किंवा वाराणासी या ठिकाणांनाही तुम्ही 7 हजार रुपयांमध्ये भेट देऊ शकता.
प्रवासातील अवाजवी खर्च कमी करण्यासाठी बंक बेड, हॉस्टेल किंवा होम स्टेला पसंती देणं अनेकांसाठीच फायदेशीर पर्याय आहे. काय मग, खर्चाची चिंता सोडून प्रवासाला कधी निघताय?