भारतात घटस्फोटासंदर्भात कठोर कायदा आहे. जिथे पोटगी हा पत्नीचा अधिकार मानला जातो.
पत्नीच्या उदरनिर्वाहाची व्यवस्था कायदेशीरदृष्ट्या पतीला करावी लागते.
अनेक ठिकाणी घटस्फोटीत महिलांकडे दयेच्या भावनेने पाहिले जाते.
जगात असाही एक देश आहे, जिथे घटस्फोट चुकीचा मानला जात नाही.
येथे घटस्फोटित महिलांचा बाजारदेखील भरतो. जिथे महिलांना चांगले आयुष्य मिळते.
या बाजारात महिलांना रोजगार मिळण्यासोबत आयुष्याचा जोडीदारदेखील मिळतात.
पुरुषांनादेखील त्यांच्या मनाप्रमाणे आयुष्याचा जोडीदार मिळतो.
या देशाचे नाव मॉरिटानिया आहे. जो उत्तर पश्चिम आफ्रिकेत आहे.
येथील संस्कृतीत घटस्फोट एक महत्वाचा भाग आहे.
घटस्फोट घेणाऱ्या महिलांना येथे खूप सन्मान दिला जातो.
येथे घटस्फोटीत महिलेचे नातेवाईक अभिमानाने सांगतात, आमची मुलगी घटस्फोटित आहे.
मॉरिटानियामध्ये घटस्फोटित महिलांना अधिक समजूतदार आणि परिपक्व मानले जाते.
या देशात घटस्फोटीत महिलांचे लग्न होण्यात कोणत्याही अडचणी येत नाहीत.
(Disclaimer -वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)