एका दिवसाचे प्रहर किती? याचा तुमच्याशी संबंध काय?

Feb 15,2025


हिंदू धर्मात प्रहरांना विशेष महत्त्व आहे. हिंदू गणनेनुसार एका दिवसात एकूण आठ प्रहर असतात.


पहिला प्रहर हा संध्याकाळी 6 ते 9 पर्यंत असतो, याला प्रदोष काळदेखील म्हणतात.


रात्री 9 ते 12 या वेळेला दुसरा प्रहर असतो. या वेळी झाड झुडपांना हात लावू नये.


तिसरा प्रहर हा 12 ते 3 दरम्यानचा असून हा अशुद्ध काळ मानला जातो. या वेळी माणसांनी गाढ झोपेत असायला हवे.


पहाटे 3 ते 6 वाजेपर्यंत चौथा प्रहर असतो. शास्त्रांमध्ये या वेळेला ब्रह्म मुहूर्त सांगण्यात आले आहे. हा अतिशय शुभ मुहूर्तांपैकी एक आहे.


6 ते 9 हा पाचवा तर 9 ते 12 हा सहावा प्रहर असतो. या प्रहराला शुभ कार्य केले जातात.


दुपारी 12 ते 3 हा सातवा प्रहर असतो. या प्रहरात जेवणे आरोग्याच्या दृष्टीने योग्य असते.


शेवटी 3 ते 6 या वेळेला आठवा प्रहर म्हणतात.


या प्रहरांनुसार दैनंदिन क्रिया केल्याने निरोगी आणि तणावमुक्त आयुष्य जगता येते.


(Disclaimer: सदर माहिती ज्योतिष शास्त्र आणि सामन्य ज्ञानावर आधारित असून झी 24 तास या गोष्टींची खातरजमा करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story