आपल्या रोजच्या जेवणात आपण मीठाचा वापर करतो. मीठाशिवाय पदार्थाची चव अपूर्ण असते.
तुम्हाला माहित आहे का, जगातील सर्वात महागडे मीठ कोणते? याची किंमत खरंच आश्चर्यचकित करणारी आहे.
कोरियामध्ये बनणारे 'बँबू सॉल्ट' हे जगातील सर्वात महागडे मीठ आहे. या एक किलो मीठाची किंमत जवळपास 30,000 रुपये इतकी आहे.
हे मीठ तयार करण्यासाठी बांबूमध्ये समुद्राचे मीठ घातले घालून उच्च तापमानावर चांगल्यारितीने भाजले जाते.
कमीत कमी नऊ वेळा 80 डीग्री सेल्सियसवर हे मीठ भाजले जाते. बांबूमध्ये असलेली खनिजे मीठात मिसळतात.
हे खास प्रकारचे मीठ बनवण्यासाठी वेळही भरपूर लागतो. मीठात पोटॅशियम, कॅल्शियम आणि मॅग्नेशियम सारखी अनेक खनिजे असतात. यामुळे शरीरातील अँटी-ऑक्सिडंट्स वाढतात.
या मिठाच्या सेवनामुळे संधिवात आणि घसा खवखवणे यासारख्या समस्यादेखील दूर होण्यास मदत होते.