सहसा नेलकटरचा वापर नखं कापण्यासाठी केला जातो आणि ही वस्तू फक्त नखं कापण्यासाठीच वापरली जाते असाच अनेकांचा समज होतो.
नेलकटरला एल लहानसं सुरीवजा पातंही असतं. या पात्याचा वापर तुम्ही सुरी, किंवा कटर म्हणून करु शकता. प्रवासात ही गोष्ट अतिशय मदतीची ठरते.
एखाद्या प्रवासाला निघालं असता फळं कापण्यासाठी, एखादा दोरा, धागा कापण्यासाठी किंवा काही इतर कामांसाठी हा ब्लेड वापरता येतो.
अॅल्युमिनिअमचं झाकण असणाऱ्या सीलबंद बाटल्या उघडण्यासाठी नेलकटरला असणाऱ्या ओपनर ब्लेडचा वापर होतो.
नेलकटरच्या टोकाशी एक लहानसं छिद्र असतं. अनेकांनाच याचा नेमका वापर लक्षात येत नाही. मग काही मंडळी त्या छिद्राला किचैन अडकवताना दिसतात.
प्रत्यक्षात या छिद्राच्या वापरानं अॅल्युमिनिअमची तारही वाकवता येते. काही कारणास्तव तार वळवायची असल्यास ती या छिद्राच्या मदतीनं वळवता येते. स्क्रू , नटबोल्ट उघडण्यासाठी नेलकटरच्या ब्लेडमधील तीक्ष्ण भागाचा वापर करता येतो.