गरोदरपणानंतर महिलांना अनेक शारीरिक बदलांमधून जावे लागते. यापैकीच एक म्हणजे वजन वाढणे.
अशातच बाळंतपणानंतर वजन कमी करण्यासाठी महिलेला खूप मेहनत करावी लागते. परंतु 5 टिप्स वापरून तुम्ही तुमचं वजन कमी करू शकता तसेच वाढलेलं पोट देखील कमी करू शकता.
हिरव्या भाज्या, फळ, पौष्टिक आणि प्रोटीनयुक्त अन्नाचा तुमच्या आहारात समावेश करा. तसेच भरपूर प्रमाणात पाणी प्या.
गरोदरपणानंतर योगा, चालणे असे सोपे व्यायाम करा. साखरेचे सेवन करणं टाळा.
ब्रेस्टफिडींगमुळे कॅलरीज बर्न होतात, ज्यामुळे वजन कमी करण्यास मदत होते.
गरोदरपणानंतर महिलेचे वाढलेलं पोट तुम्ही कपड्याने बांधू शकता, ज्यामुळे पोट लवकर शेपमध्ये येण्यास मदत होते.
गरोदरपणानंतर महिलेच्या वाढलेल्या पोटाला नारळ तेलं, मोहरी तेल, ऑलीव्ह ऑईल इत्यादीने मसाज करावा, ज्यामुळे स्किन टाईट होते.
(इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. अधिक माहितीसाठी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)