सोशल मीडियावर 'आईस क्वीन' या नावाने प्रसिद्ध असणारी रशियन गर्ल एन्ना गेल्किना सध्या सोशल मीडियावर फारच चर्चेत आहे.
एन्नाला बर्फ खूप आवडतो. ती बर्फातच राहते, बर्फातच खाते. तिचे अनेक व्हिडीओ व्हायरल होतं असतात.
@galkina_anechka या अकाउंटवर तिचे लाखो फॉलोवर्स असून लोकांना तिची अनोखी जीवनशैली आवडते.
एन्ना गेल्किना स्वतःला आईस क्वीन म्हणवून घेते. तिचे फॅन्स सुद्धा तिला याच नावाने ओळखतात.
एन्ना बर्फाच्छादित ठिकाणांवर जात असते आणि तिथे जाऊन तिला आलेले वेगवेगळे अनुभव शेअर करत असते.
एन्ना गेल्किना तिच्या पोस्टमध्ये दाखवते की बर्फात राहणं शरीरासाठी किती फायदेशीर ठरतं.