काळ्या मिठामध्ये अनेक प्रकारचे खनिजतत्त्व आणि डिटॉक्सिफाइन गुण असतात. याच्या सेवनाने शरीरातील टॉक्सीन्स देखील बाहेर पडतात.
गूळ आणि काळ मीठ हे फूड कॉम्बिनेशन विचित्र वाटतं असलं तरी यामुळे शरीराला अनेक फायदे मिळू शकतात.
गूळ आणि काळ मीठ खाल्ल्याने मेटाबॉलिज्म फास्ट होतं आणि वजन कंट्रोलमध्ये येतं.
गूळ आणि काळ मीठ शरीराला आजार आणि संसर्गापासून वाचवण्यास मदत करतात.
गुळाचा एक तुकडा आणि चिमूटभर काळ मीठ खाल्ल्याने श्वसनाच्या दुर्गंधी संबंधित समस्या दूर होतात.
गूळ आणि काळ मीठ यांच्या मिश्रणाचे सेवन केल्याने पोटात ऍसिडिटी होतं नाही.
(इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. आपण कोणत्याही पदार्थाचं सेवन करण्याआधी याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)