चालण्याचे 6-6-6 सूत्र काय आहे? लठ्ठपणा करते कमी

तेजश्री गायकवाड
Jan 21,2025


आजकाल चालणे हे फिटनेसचे सर्वात मोठे सूत्र मानले जाते. दररोज चालण्याने लवकर वजन कमी करण्यास मदत करते.


आजकाल चालण्याचा एक नवीन '6-6-6' असा फॉर्म्युला जोरदार ट्रेंडमध्ये आहे. हा फॉर्म्युला लवकर वजन कमी करण्याचा एक प्रभावी मार्ग आहे.

काय आहे 6-6-6 हे सूत्र?

यामध्ये तुम्हाला दररोज 60 मिनिटे चालावे लागेल. याची वेळ सकाळी 6 किंवा संध्याकाळी 6 असावी. तुम्ही 6-मिनिटांचा वॉर्म-अप आणि 6-मिनिटांचा कूल-डाउन करा.


जेव्हा तुम्ही दररोज ठराविक वेळेसाठी चालता, तेव्हा ते जलद वजन कमी करण्यास मदत करते. दररोज 60 मिनिटे चालल्याने तुमचा फिटनेसही वाढतो.


यामुळे हृदयविकार, मधुमेह आणि उच्च रक्तदाबाचा धोका कमी होतो. तुम्ही पूर्वीपेक्षा जास्त सक्रिय आणि उत्साही आहात. झोप सुधारते आणि तणाव कमी होतो.


(Disclaimer: इथे देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित आहे. याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)

VIEW ALL

Read Next Story