पहिल्यांदा मदर्स डे कधी आणि कुणी साजरा केला?

दक्षता ठसाळे-घोसाळकर
May 08,2024


मे महिन्यातील दुसऱ्या रविवारी जगभरात 'मदर्स डे' साजरा केला जातो. हा दिवस आईचे महत्त्व, प्रेम आणि समर्पण याला समर्पित केले जाते. यंदा हा दिवस 12 मे रोजी साजरा केला जाणार आहे.


मदर्स डे ची सुरुवात 1908 रोजी अमेरिकेत झाली. अमेरिकेतील महिला एना जार्विसच्या प्रयत्नाने या दिवसाची सुरुवात झाली. नंतर हा दिवस हळूहळू जगभरात साजरं करायला सुरुवात केली.


एना जार्विसने या दिवसाची सुरुवात तिची आई ऐन रीव्स जार्विसच्या आठवणीत केली होती. 1905 मध्ये एन रीव्स जार्विस यांचे निधन झाले होते. एना जार्विसने 1908 साली आईच्या प्रेमाखातर फिलाडेल्फियामध्ये एका शोक सभेचे आयोजन केलं.


ऐन रीव्स जार्विस या एक कार्यकर्ता आणि शिक्षिका होत्या. अमेरिकेतील गृहयुद्धातील दोन्ही पक्षातील जखमी सैनिकांची काळजी घेत आणि शांततेला प्राधान्य दिलं.


एना आई ऐन रीव्सच्या अतिशय जवळ होती. त्यांच्या मृत्यूनंतर तिने मदर्स डे नॅशनल हॉलिडेच्या स्वरुपात साजरा करण्याचे अभियान सुरु केलं.


ज्यानंतर 1914 साली अमेरिकेचे राष्ट्रपती वुडरो विल्सन यांनी मातांना सन्मानित करण्यासाठी हा दिवस 'नॅशनल हॉलीडे' साजरा करण्याचा निर्णय घेतला. हा दिवस मे महिन्यातील दुसऱ्या रविवारी साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला.


अमेरिका, भारत, न्यूझीलंड, कॅनडा आणि इतर देशांमध्ये मे महिन्यातील दुसऱ्या रविवारी हा दिवस साजरा केला जातो. तर रशियामध्ये मार्च महिन्यातील शेवटच्या रविवारी मदर्स जे साजरा केला जातो. थायलंडमध्ये ऑगस्ट महिन्यात राजाच्या आईच्या जयंतीच्या दिवशी मदर्स डे साजरा केला जातो.


या दिवशी प्रत्येक देशातील नागरिक आपल्या आईकरिता काही ना काही करताना दिसतात. मदर्स डेच्या दिवशी प्रत्येक मुलं आपल्या आईसाठी काही ना काही खास करताना दिसतात.

VIEW ALL

Read Next Story