मेथी दाणे आरोग्यासाठी आणि केसांसाठी खरच फायदेशीर आहेत. ते बहुतेक घरांमध्ये सहज उपलब्ध होतात.
मेथीमध्ये भरपूर फायबर असते आणि त्याचा आहारात समावेश केल्यास त्याची फक्त चव बदलणार नाही तर त्यासोबत तुम्हाला खूप पोषण मिळू शकतात.
केसांना मेथीचे दाणे लावल्याने केस मजबूत होतात असे मानले जाते. मेथीच्या बियांचे सेवन करणे सामान्यतः फायदेशीर असते, मात्र मेथी काहीजणांची हानिकारक देखील ठरू शकते.
विशेषतः उच्च रक्तदाब असलेल्यांनी ते टाळावे. श्वास घेण्यास त्रास होत असलेल्या व्यक्तींनी देखील त्याचे सेवन टाळायला हवे.
मेथी उष्ण असल्याने गरोदर महिलांनी मेथीचे सेवन ते टाळावे,
ज्यांना पचनाच्या समस्या किंवा पोटाशी संबंधित समस्या आहेत त्यांनी मेथी खाणे टाळावे कारण यामुळे गॅस आणि अपचन बिघडू शकते.
त्वचेची अॅलर्जी असणाऱ्यांनी मेथीच्या सेवनाने सावध राहावे. त्वचेची जळजळ किंवा पुरळ उठणाऱ्यांसाठी मेथीचे सेवन करणे टाळा. (Disclaimer : वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.) (All Photo Credit : Freepik)