तुम्ही पाहिलं असेल अनेक लोक त्यांच्या घराबाहेर किंवा गाड्यांच्या वर लाल रंगाच्या बाटल्या ठेवतात.
काहीजण ट्रान्सपरंट प्लास्टिकच्या बॉटलमध्ये लाल रंगाचं पाणी ठेवतात. पण यामागचं नेमकं कारण काय हे अनेकांना माहित नसतं. तेव्हा आज याच कारण जाणून घेऊयात.
अनेकदा घराबाहेर भटक्या कुत्र्यांचा वावर असतो. ही कुत्रे घराजवळ येऊन तेथे ठेवलेल्या सामनाचं नुकसान करू नये यासाठी लाल रंगाच्या बाटल्या घराजवळ ठेवल्या जातात.
काहींचं म्हणणं आहे की, कुत्रे लाल रंग पाहून घाबरतात आणि जिथे लाल रंग असेल त्यापासून दूर पळतात.
अशातच कुत्र्यांना घरापासून दूर ठेवण्यासाठी लाल रंगाच्या बॉटल घराबाहेर टांगून ठेवल्या जातात.
तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, कुत्रे हे कलर ब्लाईंड असतात. त्यांना फक्त काहीच रंग ओळखू येतात.
तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार कुत्र्यांना लाल रंग ओळखू येतो परंतु ते या लाल रंगाला घाबरतातच असं नाही. परंतू असे असले तरी कुत्रे घराच्या आसपास भटकू नयेत म्हणून अनेकजण घराबाहेर लाल रंगाच्या बाटल्या ठेवतात.
(इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)