तजेलदार त्वचा ते वजन नियंत्रणात...; फणसाच्या बियांचे आहेत असंख्य फायदे

उन्हाळ्यात मोठ्या आवडीने फणस खाल्ला जातो. मात्र फणसाचे गरे खाल्ल्यानंतर त्या बिया फेकून दिल्या जातात.

Mansi kshirsagar
May 13,2024


खरं तर फणसाच्या बियांमध्येही अनेक पौष्टिक तत्वे आढळतात. आरोग्यासाठी ते फायदेशीर आहेत.


फणसाच्या बियांमध्ये मोठ्या प्रमाणात जीवनसत्व आढळते. फणसाच्या बिया उकडून त्यात थोडं मीठ टाकून खावू शकता.


फणसाच्या बियांमध्ये मॅग्निशिअम आणि कॅल्शियम असते. त्यामुळं हाडांना बळकटी येते व हाडे मजबूत होतात.


फणसाच्या बियांमध्ये फायबर आढळते. त्यामुळं पाचनक्रिया सुधारते. तसंच, वजन कमी होण्यासही मदत होते.


बियांमध्ये असलेले जीवनसत्व ए डोळे, केस आणि त्वचेसाठी फायदेशीर आहे.


फणसाच्या बियांमध्ये लोह असते. जे शरीरात हिमोग्लोबिन आणि लाल रक्तपेशी वाढवण्यास मदत करतात.


(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story