रशियाच्या सर्वोच्च शिखरावर तिरंगा

पुण्याच्या स्मिता दुर्गादास घुगे यांनी 15 ऑगस्ट रोजी रशियातील सर्वोच्च शिखर माउंट एल्ब्रूसवर चढाई करताना ३९०० मी ऊंचीवर ७५ फूटी तिरंगा फडकवला होता.

Aug 18,2023

माउंट एल्ब्रूस पादाक्रांत करण्याचा विक्रम

यावेळी घुगे यांनी मेरी माटी मेरा देश माटी को नमन वीरो को वंदन अशा घोषणाही त्यांनी दिल्या होत्या. त्याचबरोबर 5 हजार 642 मीटर उंचीचे हे माउंट एल्ब्रूस शिखर पादाक्रांत करण्याचाही विक्रम केला.

नऊवारी साडी नेसून फडकवला तिरंगा

याच शिखरावर 3 हजार 900 मी ऊंचीवर पोहोचल्यानंतर घुगे यांनी नऊवारी साडी नेसून 75 फूटी भव्य तिरंगा फडकवून नवा विश्व विक्रम केला आहे.

याआधी सुद्धा केला होता विक्रम

या आधी स्मिता यांनी माउंट किलीमांजारो हे आफ्रिका खंडामधील सगळ्यात उंच शिखर सर केले होते. 19341 फूट (5895 मी) उंची असलेल्या या शिखरावरही 75 फूट तिरंगा ध्वज दोन वर्षांपूर्वी फडकवला होता.

माऊंट एव्हरेस्ट देखील केलाय सर

यासोबतच स्मिता घुगे यांनी आशिया खंडातील माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प देखील सर केले आहे. गेल्या वर्षी शिवजयंतीनिमित्ताने तिथे त्यांनी 40 फूट लांब भगवा ध्वज फडकवला होता.

महाराष्ट्रातील लोकांमुळे यश मिळाले

"माझ्यासाठी व पूर्ण महाराष्ट्रासाठी हा अभिमानाचा क्षण आहे. अत्यंत प्रतिकूल वातावरणात महाराजांची प्रेरणा माझ्या मनात होती, स्मिता घुगे यांनी सांगितले.

हुंड्याच्या पैशातून किलीमांजारो केले सर

हुंड्यासाठी जमवलेले पैसे, लग्नासाठी केलेले दागिने विकून टाकत घुगे यांनी माउंट किलीमांजारो सर केले होते. यावेळी त्यांनी ‘से नो टू डावरी!’असा फलक घेऊन चढाई केली होती.

VIEW ALL

Read Next Story