माहिम परिसरात असलेला हजरत पीर मखदुम शाह बाबा दर्गा हा मुस्लिम बांधवांचे श्रद्धास्थान आहे. हा दर्गा माहिमचा दर्गा म्हणूनच ओळखला जातो.
10 दिवस हा उरुस साजरा केला जातो. या काळात माहिमच्या खाऊ गल्लीत वेगळीच रौनक पहायला मिळते.
माहीमच्या मखदुमशाह बाबा दर्ग्याचा उरुसाला 120 वर्षांची परंपरा आहे. विशेष म्हणजे दर्गाला चादर अर्पण करण्याचा पहिला मान हा मुंबई पोलिसांना दिला जातो.
माहिमच्या खाऊ गल्लीत विविध प्रकारचे डेजर्ट देखील मिळतात. इथला मालपोवा खूपच प्रसिद्ध आहे.
विविध प्रकारचे कबाब, नान बिर्यानी येथे मिळतात. यांची चव चाखून खवय्ये खूश होतात.
माहिमची खाऊ गल्ली ही नॉनव्हेजसाठी जास्त प्रसिद्ध आहे.
माहिम दर्ग्याबाहेर मोठी खाऊ गल्ली आहे. यामुळे केवळ भाविकच नाहि तर खवय्ये देखील येथे मोठ्या संख्येने भेट देत असतात.
माहिम दर्ग्यात आल्यावर सर्व इच्छा पूर्ण होतात. यामुळे सर्व धर्मीय येथे येत असतात.