मर्यादापुरुषोत्तम राम आणि माता सीता यांचं नातं अनेकांसाठी आदर्श अन् त्याचागी परिभाषा सांगणारं.
याच सीता मातेचं हरण करून रावणानं त्यांना लंकेत नेलं होतं. हे तेच दिवस होते जेव्हा, प्रभू श्रीराम आणि त्यांचे बंधू लक्ष्मण यांच्यासह माता सीता वनवासात होते.
वनवासाच्या 14 वर्षांचा कालावधी पूर्ण होण्यास अवघं एक वर्ष शिल्लक असतानाच रावणानं सीतेचं हरण केलं.
वाल्मिकरचित रामायणात उल्लेख केल्यानुसार माता सीता लंकेत 435 दिवस होत्या. सुरुवातीला रावणानं सीतेला मंदोदरीच्या महालात ठेवलं होतं.
यानंतर त्यांना अशोक वाटिकेत पाठवलं गेलं, जिथं त्या 11 महिने राहिल्याचं म्हटलं जातं. पौराणिक कथांनुसार लंकेतून परतताना सीता मातेचं वय 33 वर्षे होतं असं म्हटलं जातं.