श्रावणात 3 गोष्टी करा, अन् काल सर्प दोषापासून मुक्ती मिळवा!
कालसर्प योग हा कुंडलीतील ग्रहांच्या स्थितीचा प्रकार आहे. जो कोणाच्याही कुंडलीत निर्माण होऊ शकतो.
श्रावण महिन्यात दोष दूर करण्याचा सर्वात सोपा उपाय म्हणजे भगवान शंकराला प्रसन्न करणं.
4 जुलैपासून श्रावण महिना सुरू होत आहे. त्यामुळे पुढील उपाय केल्यास कालसर्प दोषापासून मुक्ती मिळेल.
कालसर्प दोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी रुद्रसूक्ताने आशीर्वादित पाण्याने अखंड स्नान करा. व्रत ठेवून जर हा उपाय केल्यास अधिक फायदा होतो.
शिवलिंगावर तांब्याचा नाग अर्पण करा.
वाहत्या पाण्यात चांदीच्या नागाची जोडी सोडा.
चांदीचे स्वस्तिक बनवून घराच्या दाराच्या चौकटीवर किंवा मुख्य दरवाजावर लावा.
श्रावणात घरी रुद्राभिषेक करणे फायदाचं ठरते.
घरात मोराची पिसे ठेवा आणि सकाळी उठल्यानंतर आणि रात्री झोपण्यापूर्वी भगवान शिव आणि कृष्णाचे ध्यान करून मोराच्या पिसांकडे पाहा.(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)