आयुष्यात एवढे पण साधे बनून राहू नका की कोणीही तुमचा फायदा उठवून जाईल.
एखाद्यासोबत एवढे पण गोड बोलू नका की त्याला तुमचं बोलणं खोट वाटेल.
एखाद्यासमोर इतकेच झुका जितकी गरज आहे. सन्मानाने जगा.
नेहमी चांगले मित्र बनवा. चांगल्या मित्रांच्या संगतीत रहा.
भूतकाळाचा विचार सोडून द्या, भविष्यावर लक्ष केंद्रित करा.
स्वतःची ऐपत असेल तितकंच दान करा.
अंथरूण पाहून पाय पसरावे. स्वतःची कमाई पाहून खर्च करा.
दुसऱ्यांच्या चुकांमधून धडा घ्या आणि स्वतःच्या आयुष्यात त्या चुका करू नका.
कोणत्याच व्यक्तीकडून कोणतीच अपेक्षा ठेवू नका. स्वतःची काम स्वतः करा.