Vastu Tips : संध्याकाळी किती वाजता तुळशीजवळ दिवा लावावा?
हिंदू धर्मात तुळशीच्या रोपाला विशेष महत्त्व आहे. तुळशीची रोज पूजा केल्याने अनेक समस्या दूर होतात.
तुळशीच्या रोपामध्ये माता लक्ष्मीचा वास असतो अशी मान्यता आहे. तुळशीची रोज पूजा केल्यास पैशाची कमतरता दूर होते, अशी श्रद्धा आहे.
वास्तूशास्त्रानुसार तुळशीजवळ दिवा लावणे खूप शुभ मानले जाते. घरात सकारात्मक ऊर्जा नांदते आणि नकारात्मक ऊर्जा दूर होते.
तुळशीजवळ दिवा कधी लावावा, याबद्दल हिंदू धर्मात सांगण्यात आलंय.
सूर्यास्ताच्या वेळी म्हणजे संध्याकाळी 5-6 च्या दरम्यान तुळशीजवळ दिवा लावणे शुभ मानले जाते.
यावेळीत घरात लक्ष्मीचे आगमन होतं, अशी मान्यता आहे.
तुळशीच्या रोपाजवळ तुपाचा दिवा लावणे शुभ मानले जाते. यामुळे घरात सुख समृद्धी नांदते.
आर्थिक समस्या दूर करण्यासाठी धनवर्षाव होण्यासाठी तुळशीजवळ तुपाचा दिवा लावावा.
(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)