पाकिस्तानची 18 वर्षीय महिला क्रिकेटर आयशा नसीमच्या एका निर्णयाने सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आहे.
आयशा नसीमने क्रिकेटमधून संन्यास घेत असल्याचं जाहीर केलं आहे. आता आपल्याला इस्लामनुसार जगायचं असल्याचं आयशाचं म्हणणं आहे.
युवा खेळाडू आयशा नसीमने तीन वर्षांपूर्वी म्हणजे 2020 मध्येच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं.
पाकिस्तानची ही धडाकेबाज क्रिकेटर टी-20 वर्ल्डकपमध्येही खेळली होती. आपल्या तुफानी खेळीने तिने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं.
आयशाने आपल्या करिअरमध्ये 30 टी-20 आंतरराष्ट्रीय आणि 4 एकदिवसीय सामने खेळले आहेत. यावेळी तिने टी-20 मध्ये 369 आणि वन-डेत 33 धावा केल्या.
पाकिस्तानी मीडियानुसार आयशाने म्हटलं की, मी क्रिकेट सोडत असून आता मला इस्लामप्रमाणे जीवन जगायचं आहे.
आयशाने आपल्या निर्णयाबद्दल पाकिस्तानी क्रिकेट बोर्डाला माहिती दिली आहे. पण अद्याप पीसीबीने याबाबत काही माहिती दिलेली नाही.
आयशाने वर्ल्डकपमध्ये 25 चेंडूत 43 धावा केल्या होत्या. त्यावेळी पाकिस्तानचा माजी कर्णधार वसीम अक्रमने तिचं कौतुक केलं होतं.