टीम इंडियाच्या वेस्ट इंडिज दौऱ्याची सुरुवात कसोटी मालिकेने झाली. दोन कसोटी सामन्यांची ही मालिका भारताने 1-0 अशी जिंकली.

Jul 25,2023


कसोटी मालिकेनंतर भारत आणि वेस्ट इंडिजदरम्यान आता तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे.


पहिले दोन एकदिवसीय सामने बारबाडोसमध्ये तर शेवटचा एकदिवसीय सामना त्रिनिदादमध्ये खेळवला जाणार आहे.


भारत आणि वेस्ट इंडिजदरम्यानचा पहिला एकदिवसीय सामना 27 जुलैला म्हणजे गुरुवारी बारबाडोसमध्ये खेळवला जाणार आहे.


पहिला एकदिवसीय सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7 वाजता सुरु होणार आहे.


भारत आणि वेस्ट इंडिजदरम्याचा पहिला सामना डीडी स्पोर्ट्सवर दाखवला जाणार आहे.


तर या एकदिवसीय सामन्याचं लाईव्ह स्ट्रिमिंग जियो सिनेमा अॅपवर केलं जाणार आहे.


कसोटी प्रमाणेच एकदिवसीय मालिकेतही भारतीय संघाचं नेतृत्व रोहित शर्माकडे असणार आहे. तर हार्दिक पांड्या उपकर्णधार आहे.


एकदिवसीय मालिकेसाठी यशस्वी जयस्वालला संधी देण्यात आलेली नाही. त्याऐवजी ऋतुराज गायकवाड, सुर्यकुमार यादव, संजू सॅमसन यांना इन करण्यात आलंय.


तर गोलंदाजीत उमरान मलिक, यजुवेंद्र चहल आणि कुलदीप यादव यांना संघात संधी मिळालीय.

VIEW ALL

Read Next Story