भारतात या वर्षाच्या अखेरीस म्हणजे ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात वन डे वर्ल्ड कप स्पर्धा खेळवली जाणार आहे.
वन डे वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारतीय संघाचा कट्टर प्रतिस्पर्धा पाकिस्तान क्रिकेट संघ भारात येणार आहे.
पण वन डे वर्ल्ड कप स्पर्धेनंतर पाकिस्तानचा संघ एकही आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळणार नाही. पीसीबी म्हणजे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने याबाबतची घोषणा केली आहे.
पाकिस्तान संघ सध्या श्रीलंकेबरोबर 2 सामन्यांची कसोटी मालिका खेळतोय. त्यानंतर अफगाणिस्तानविरुद्ध 3 वन डे सामन्याची मालिका खेळेल
यानंतर पाकिस्तान संघ एशिया कप 2023 स्पर्धेत खेळताना दिसेल. पाकिस्तान यंदा या स्पर्धेचा यजमान देश आहे.
भारतात वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत पाकिस्तान संघ खेळेल. पण यानंतर म्हणजे 2023 नंतर वर्षभर पाकिस्तान संघ एकही वन डे सामना खेळणार नाही.
म्हणजे वन डे वर्ल्ड कप स्पर्धेतील एकदिवसीय सामना पाकिस्तानचा या हंगामातला शेवटचा एकदिवसीय सामना असेल.
यामागे कोणत्याही बंदी कारण नाहीए. तर वास्तविक पाकिस्तान संघाची कोणत्याही संघाबरोबर वन डे सीरिज शेड्यूल्ड करण्यात आलेली ना
पीसीबीने 2023-24 वर्षाचा पाकिस्तान क्रिकेट संघाचा आगामी कार्यक्रम जाहीर केला. यात एकाही एकदिवसीय सामन्याचा शेडयूल्ड नाही
जानेवारी 2024 मध्ये पाकिस्तान 3 कसोटी सामने खेळेल त्यानंतर एप्रिलमध्ये न्यूझीलंडविरुद्ध 5 टी20 तर मे मध्ये नेदरलँडविरुद्ध 3 टी20 सामन्यांचं नियोजन करण्यात आलं आहे.
त्यानंतर इंग्लड आणि आयरलँडविरुद्धही टी20 सामने खेळणार आहे. 2024 मध्ये होणाऱ्या टी20 वर्ल्ड कपसाठी पीसीबीचा प्लान असल्याचं बोललं जातंय.