चेतेश्वर पुजारा कोणत्याही कारणाशिवाय...; सेंच्युरियन टेस्टनंतर माजी खेळाडूचं मोठं विधान

Dec 30,2023


अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा यांसारख्या अनुभवी फलंदाजांना त्यांच्या कसोटी सामन्यातुन बाहेर काढुन भारताने मोठी चूक केली, असे माजी ऑफस्पिनर हरभजन सिंगचे मत आहे.


हरभजनचं हे विधान सेंच्युरियन कसोटीनंतर आले होते जिथे टीम इंडियाला एक डाव आणि 32 धावांनी मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले होते.


या सामन्याच्या दोन्ही डावात भारतीय संघाला 250 पेक्षा जास्त धावा करता आल्या नाहीत तर यजमानांनी 400 धावांचा टप्पा ओलांडला होता.


टेस्ट क्रिकेटमध्ये पुजारापेक्षा सद्यस्थितीत भारताकडे कोणताही चांगला फलंदाज नाही, असा दावाही त्याने केला आहे.


हरभजन सिंग त्याच्या यूट्यूब चॅनलवर म्हणाला, 'अजिंक्य रहाणेची निवड झाली नाही आणि चेतेश्वर पुजाराला कोणतेही कारण नसताना वगळण्यात आले. हे दोन खेळाडू आहेत ज्यांनी सर्वत्र धावा केल्या आहेत.


मागील विक्रमावर नजर टाकली तर पुजाराने कोहलीइतकेच योगदान दिले आहे. मला समजत नाही की पुजाराला का बाहेर काढण्यात आले? इंडियाकडे अजूनही कसोटी क्रिकेटमध्ये पुजारापेक्षा चांगला फलंदाज नाही.


पुजारा हळुखेळतो पण क्रिज वर टिकतो, त्याच्यामुळे भारताने ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडमध्ये कसोटी जिंकल्या आहेत. सेंच्युरियन कसोटीतील भारताच्या पराभवावर हरभजनने सांगितले की, पहिल्या डावातील कामगिरीनंतरच टीम इंडियाचा पराभव निश्चित होतो.

VIEW ALL

Read Next Story