यंदाच्या 19 वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा 79 धावांनी धुव्वा उडवला.
टीम इंडियाला ऑस्ट्रेलियाने दिलेलं 254 धावांचं आव्हान पार करता आलं नाही. त्यामुळे भारतात निराशात्मक परिस्थिती पहायला मिळतीये.
अशातच आता भारताच्या पराभवानंतर पाकिस्तानात मात्र फटाके फुटत असल्याचं पहायला मिळतंय. अशातच आता सोशल मीडियावर देखील चर्चेला उधाण आलंय.
पाकिस्तानी ट्रोलर्सने सोशल मीडियावर भारताला चोकर्स म्हणायला सुरूवात केलीये. त्यावर आता टीम इंडियाचा माजी ऑलराऊडर इरफान पठाण याने सणसणीत उत्तर दिलंय.
पाकिस्तानचा अंडर-19 संघ अंतिम फेरीत पोहोचला नसला तरीही, सीमेपलीकडील कीबोर्ड योद्ध्यांना आमच्या तरुणांच्या पराभवाचा आनंद वाटतो, असं इरफान पठाण पोस्ट केलंय.
पाकिस्तानची ही नकारात्मक वृत्ती त्यांच्या देशाच्या मानसिकतेवर वाईटरित्या प्रतिबिंबित करते, असं म्हणत इरफाण पठाणने पाकड्यांना चिमटे काढले आहे.
विजयापासून ते संकटापर्यंत, प्रत्येक सामना आमच्या संघाच्या अविचल आत्मा, दृढनिश्चय आणि कौशल्याचा पुरावा बनला, असं बीसीसीआय सचिव जय शाह यांनी म्हटलं आहे.