आयपीएलनंतर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर आता देशांतर्गत क्रिकेटमध्ये आपली छाप पाडण्यासाठी मेहनत घेतोय.
आयपीएल 2023 मध्ये मुंबई इंडियन्सकडून डेब्यू केल्यानंतर अर्जुन सध्या देवधर ट्रॉफीमध्ये गोलंदाजी करताना दिसला.
अर्जुन साऊथ झोनकडून खेळत असून मयांक अग्रवालने मात्र त्याला फायनल सामन्यात त्याचा प्लेईंग 11 मध्ये समावेश केला नाही. त्याच्या जागी वेगवान गोलंदाज विदावथ कवेरप्पाचा समावेश करण्यात आला
अर्जुनने तो देवधर ट्रॉफीमध्ये दक्षिण विभागाकडून दोन सामने खेळले. ज्यामध्ये अर्जुनने पहिल्या सामन्यात ईशान्य विभागाविरुद्ध 1 विकेट घेतलेली. तर साऊथ झोनविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात 2 विकेट्स घेता आल्या.
तर यंदाच्या आयपीएलमध्ये पंजाब किंग्सचा भाग असलेल्या विद्वथ कवेरप्पाने आपल्या गोलंदाजीने कहर केला होता.
देवधर ट्रॉफीच्या चार सामन्यांत विदावथ कवेरप्पाने आतापर्यंत 11 विकेट्स घेतलेत. यावेळी त्याने उत्तर विभागाविरुद्ध 17 रन्समध्ये 5 विकेट्सही घेतल्या होत्या. कदाचित याच कारणामुळे अर्जुनला फायनलच्या सामन्यातून वगळ्यात आलं असावं.