आयपीएलनंतर रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया टी-ट्वेंटी वर्ल्ड कप खेळणार आहे.
रोहित शर्मानंतर टीम इंडियाचा कॅप्टन कोण? असा सवाल क्रिडाविश्वात विचारला जातोय.
अशातच टीम इंडियाचा माजी स्टार फलंदाज सुरेश रैना याने रोहितनंतर कॅप्टन कोण असेल? याचे संकेत दिले आहेत.
नुकत्याच सुरेश रैनाने दिलेल्या एका मुलाखतीत सुरेश रैनाने शुभमन गिलचं कौतूक केलं.
सौरव दादा आणि लक्ष्मण जसे होते, त्याप्रमाणे शुभमनची कॅप्टन्सी दिसत आहे. तो त्या पद्धतीचा प्लेयर आहे, असं सुरेश रैना म्हणतो.
रोहित शर्मानंतर तो टीम इंडियाचा कॅप्टन होऊ शकतो, असं मोठं वक्तव्य सुरेश रैनाने केलं आहे.
शुभमन गिल तडगा कॅप्टन तसेच तगडा फलंदाज देखील आहे. कॅप्टन्सीमुळे त्याच्या बॅटची धार थोडी ओसरली असं वाटतं. मात्र, गेल्या काही सामन्यात त्याने चांगली फलंदाजी केली, असंही रैना म्हणाला.