BCCI बरोबरच्या करारानंतर 'या' कंपन्या भिकेला लागल्या; यादी फारच मोठी

Swapnil Ghangale
Feb 08,2024


भारतीय क्रिकेट नियामक मंडळाबरोबर करार करणाऱ्या कंपन्या डबघाईला किंवा तोट्यात जातात असा दावा केला जातो. असं घडलेल्या कंपन्या नेमक्या कोणत्या हे पाहूयात...

12 वर्ष सहारा

सहारा कंपनीचं नाव भारतीय क्रिकेट संघाच्या जर्सीवर जवळपास 12 वर्ष होतं.

2013 मध्ये बंदी

बीसीसीआयने 2013 मध्ये कंपनीवर स्पॉन्सरशीपसंदर्भातील बंदी घातल्यानंतर कंपनीचं नाव जर्सीवरुन गेलं पण त्यानंतर कंपनी डबघाईला लागली.

मायक्रोमॅक्स

2014 मध्ये 18.01 कोटींना भारतीय बनावटीच्या 'मायक्रोमॅक्स' कंपनीने बीसीसीआयबरोबर स्पॉन्सरशीप डील केली होती.

'मायक्रोमॅक्स'चा निभाव लागला नाही

मात्र यानंतर चिनी स्मार्टफोन कंपन्यांच्या स्पर्धेत 'मायक्रोमॅक्स'चा निभाव लागला नाही आणि कंपनी स्मार्टफोन मार्केटमधील स्पर्धेबाहेर फेकली गेली.

व्हिवो

2018 ते 2022 दरम्यान इंडियन प्रिमिअर लिगचे टायटल स्पॉन्सर असलेली व्हिवो कंपनीही तोट्यात गेली.

स्पॉन्सरशीप गेली

चिनी मालाविरुद्धच्या मोहिमेचा मोठा फटका व्हिवो कंपनीला बसला आणि त्यांची स्पॉन्सरशीप गेली.

डीएलएफ

डीएलएफ ही कंपनी 2008 ते 2013 दरम्यान आयपीएशी संलग्न होती.

डबघाईला गेली कंपनी

मात्र 2013 नंतर डीएलएफ कंपनी बांधकाम व्यवसायच्या क्षेत्रात डबघाईला गेली.

बायजू

मागील काही वर्षांपासून भारतीय संघाच्या जर्सीवर बायजू कंपनीचं नाव दिसून येत होतं.

बीसीसीआयबरोबरचा करार मोडीत

मात्र बायजू कंपनी आर्थिक संकटात सापडल्यानंतर त्यांनी बीसीसीआयबरोबरचा करार मोडीत काढला.

ड्रीम इलेव्हन

ड्रीम इलेव्हन ही कंपनीही बीसीसीआयशी संलग्न करारामध्ये प्रमुख कंपन्यांपैकी एक आहे. मागील काही वर्षात ही कंपनी प्रामुख्याने दिसून आली.

ड्रीम इलेव्हन तोट्यात

2020 मध्ये आयपीएलची टायटल स्पॉन्सर असलेली ड्रीम इलेव्हन कंपनी 2023 मध्ये ऑनलाइन गेमिंगवर 28 टक्के जीएसटी लावल्याने तोट्यात गेली गेली.

पेटीएम

पेटीएम हे या यादीमधील ताजं उदाहरण आहे. 2015 मध्ये ते भारतीय संघाचे टायटल स्पॉन्सर होते.

कंपनीने घेतली मघार

2019 मध्ये पेटीएमला पुन्हा स्पॉन्सर होण्याची संधी मिळाली पण नंतर त्यांनी माघार घेतली. सध्या ही कंपनी संकटात सापडली आहे.

VIEW ALL

Read Next Story