World Cup 2023 मधून दोघांची गच्छंती निश्चित

World Cup 2023: आशिया वर्ल्डकपसाठी संघाची घोषणा केली आहे. या संघात 17 खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. हाच संघ वर्ल्डकपसाठी निवडला जाईल अशी शक्यता आहे. दरम्यान, या संघातून 2 खेळाडूंना मात्र डच्चू दिला जाण्याची शक्यता आहे.

Aug 22,2023

आशिया कपसाठी संघाची घोषणा

World Cup 2023: आशिया कपसाठी 17 सदस्यीय संघाची घोषणा करण्यात आली असून, यासह वर्ल्डकपमध्ये कोणता संघ मैदानात उतरेल याचं चित्रही स्पष्ट झालं आहे.

5 ऑक्टोबरला वर्ल्डकप

रोहित शर्माच्या नेतृत्वात भारतीय संघ 30 ऑगस्टला आशिया कप खेळणार आहे. यानंतर 5 ऑक्टोबरला भारतातच वर्ल्डकप खेळला जाणार आहे.

15 दिवसांत निर्णय

बीसीसीयआला 5 सप्टेंबरपर्यंत आयसीसीला संभाव्य खेळाडूंची नावं द्यायची आहेत. म्हणजेच पुढील 15 दिवसांत संघाचा निर्णय होणार आहे.

2 खेळाडूंचा पत्ता कट होणार

आशिया कपसाठी 17 खेळाडूंची निवड झाली आहे. म्हणजे वर्ल्डकपमधून 2 खेळाडूंचा पत्ता कट होणार हे नक्की आहे.

तिलक वर्माला संधी

आशिया कपसाठी निवडण्यात आलेल्या संघात एक अतिरिक्त फलंदाज आहे. संघात तिलक वर्माला पहिल्यांदाच जागा देण्यात आली आहे.

सूर्यकुमारवर टांगती तलवार

सूर्यकुमार यादवही एकदिवसीय संघात आहे. पहिल्या दोन सामन्यात त्याला संधी दिली जाण्याची शक्यता आहे. मात्र एकदिवसीय संघात चांगली कामगिरी न केल्याने त्याच्यावर टांगती तलवार आहे.

सूर्यकुमारला स्थान मिळणं कठीण

सूर्यकुमार यादवने एकदिवसीय क्रिकेटमध्ये 26 सामन्यात 24 डावांमध्ये 24 च्या सरासरीने 511 धावा केल्या आहेत. 64 ही त्याची सर्वोत्तम धावसंख्या आहे. त्यामुळे त्याला संघात स्थान दिलं मिळणं कठीण दिसत आहे.

तिलक वर्माचं पारडं जड

दुसरीकडे तिलक वर्मा डाव्या हाताचा फलंदाज असल्याने संघात स्थान मिळू शकतं. तसंच तो फिरकी गोलंदाजीही करतो. त्यामुळे गोलंदाज म्हणून योगदान देऊ शकतो.

श्रेयस अय्यरच्या पुनरागमनाची शक्यता

तसंच सूर्यकुमारला श्रेयस अय्यरच्या जागी चौथ्या क्रमांकावर पर्याय म्हणून संघात आणण्यात आलं होतं. श्रेयस आता फिट असल्याने त्याला वर्ल्डकप संघात स्थान मिळणं जवळपास नक्की आहे.

"दरवाजे सर्वांसाठी खुले"

रोहित शर्माने संघाची घोषणा करताना, दरवाजे सर्वांसाठी खुले असल्याचं सांगितलं. त्यामुळे आर अश्विन, युजवेंद्र चहल वर्ल्डकप संघात पुनरागमन करु शकतात. आशिया कपमध्ये कुलदीप यादवच्या कामगिरीवर बारीक लक्ष असेल.

VIEW ALL

Read Next Story