कोणत्याही खेळाडूसाठी आपला फिटनेस खूप महत्वाचा असतो ही मंडळी कायमच डाएट आणि वर्कआउट फॉलो करतात.
तुम्ही कधी विचार केला आहे का, की हे खेळाडू सामन्यादरम्यान काय खात असतील?
खेळाआधी, खेळाडू सकाळी दुधासोबत अन्नधान्य (कॉर्नफ्लेक्स, ओट्ससारखे सिरीयल्स), पास्ता आणि फळे खातात.
अनेक खेळाडूंना मांस, सॅलड, जॅम किंवा पीनट बटरसोबत सँडविच खायलाही आवडते.
दुपारच्या जेवणात खेळाडूंना 5 ते 6 प्रकारचे पदार्थ दिले जातात.
दुपारच्या जेवणात भाज्या, डाळी आणि भाजलेले बटाटे, चिकन, मटन आणि मासे दिले जातात.
जेवणात खेळाडूंना आईस्क्रीमही दिले जाते. बहुतेक खेळाडूंना विश्रांती दरम्यान चहा, कॉफी किंवा हलका नाश्ता घेणे आवडते.
बहुतेक खेळाडू कमी चरबीयुक्त पदार्थ आणि जास्त कार्बोहायड्रेट्स आणि प्रोटीन खातात.