आगामी टी-ट्वेंटी वर्ल्ड कपमुळे यंदाचा हंगाम खास असणार आहे. युवा खेळाडूंना आयपीएलमध्ये चमकदार कामगिरी करण्याची संधी मिळणार आहे.
पहिला सामना चेन्नई आणि बंगलोर यांच्यात खेळवला जाईल. मात्र, काही स्टार खेळाडू यंदाच्या हंगामात खेळताना दिसणार नाही
टीम इंडियाचा स्टार गोलंदाज मोहम्मद शमी घोट्याच्या ऑपरेशनमुळे यंदाच्या आयपीएलमध्ये खेळणार नाहीये.
आगामी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप पाहता मार्क वूड याला इंग्लंड क्रिकेट बोर्डाने वर्क लोड मॅनेजमेंटचं कारण सांगत रिलीज केलं नाही.
दुखापतीमुळे मागील आयपीएल हंगामात देखील बाहेर असणारा प्रसिद्ध कृष्णा यंदा देखील सर्जरीमुळे आयपीएल खेळणार नाही.
कोलकाता नाईट रायडर्सचा सलामीवीर फलंदाज जेसन रॉय खासगी कारणामुळे आयपीएलमध्ये खेळताना दिसणार नाही.
दुखापतीमधून बरं होण्यासाठी आणखी 6 महिने लागणार असल्याने डेवॉन कॉन्वे यंदा आयपीएलमध्ये दिसणार नाही.
दिल्लीचा सलामीवीर हॅरी ब्रुक याने खासगी कारणास्तव आयपीएलमधून माघार घेतल्याची माहिती समोर आली आहे.