ऑलम्पिक मेडलिस्ट लवलीना बोरगोहेन (Lovlina Borgohain) आणि स्विटी बूरा (Sweety Boora) यांनीही फायनलमध्ये धडक मारली आहे.
निकहत झरीनबरोबरच भारताच्या नीतून घंघसनेही (Nitu Ghanghas) अंतिम फेरी गाठली आहे. नीतूने 48 किलो वजनी गटात अलुआ बाल्किबेकोवाचा 5-2 असा पराभव केला.
गेत वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये निकहतने थायलँडच्या जिटपॉन्ग जुटामसचा 5-0 असा पराभव करत सुवर्णपदक पटकावलं होतं.
निकहत झरीनने 50 किलो वजनी गटात उपान्त्य फेरीत कोलंबियाच्या इंग्रिट वालेंसियाला धुळ चारली. निकहतने एक हाती सामना जिंकत 5-0 असा पराभव केला.
वुमेन्स वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये भारताची अव्वल बॉक्सर निकहत झरीनने (Nikhat Zareen) अंतिम फेरी गाठली आहे. निकहतने सलग दुसऱ्यांदा वर्ल्ड चॅम्पियनशिपची अंतिम फेरी गाठली आहे.