एमजीच्या कारमध्ये 10.25 इंचांचा टचस्क्रीन इंफोटेन्मेंट सिस्टीम देण्यात आला असून, तो वायरलेस अँड्रॉईड ऑटो आणि अॅपल कार प्लेला सपोर्ट करतो. या स्टिअरिंगचं डिझाईन iPad पासून प्रेरित असल्याचं सांगण्यात येतं.
कंपनीकडून या कॉम्पॅक्ट कारला बहुविध रंगांमध्ये सादर करण्यात आलं असून, ती दैनंदिन वापरात तुम्हाला उत्तम अनुभव देईल असाही दावा करण्यात येत आहे.
एमजीच्या कॉमेटची खरेदी करण्यासाठी तुम्हाला 11 हजार रुपयांची बुकींग अमाऊंट भरावी लागणार आहे. ही किंमत फार मोठी नसल्यामुळं कारप्रेमींसाठी हा मोठा दिलासा ठरत आहे.
MG Motors Comet ची बुकींग करण्यासाठी तुम्ही अधिकृत संकेतस्थळाला भेट देणं अपेक्षित असेल. अन्यथा तुम्ही डिलरशिपच्या माध्यमातूनही बुकींग करु शकता.
काही दिवसांपूर्वीच या कारला लाँच करत कंपनीनं कारचे दरही सांगितले. जिथं कारची प्राथमिक किंमत 7.98 लाख रुपये (एक्सशोरूम) असल्याचं सांगण्यात येत आहे.
एमजी मोटर्सनं नुकतीच त्यांच्या सर्वात स्वस्त अशा किफायतशीर कारची बुकींग सुरु केली. त्यामुळं कारप्रेमींना या कारबाबत जाणून घेण्यासाठी इंटरनेटचा आधार घेतला.
अवघ्या 11,000 रुपयांत बुक करा 'ही' इलेक्ट्रीक कार; महिन्याला फक्त 519 रुपयांचा खर्च