विमानाच्या इंजिनाला कार इंजिनचं सीसी अर्थात क्युबिक सेंटीमीटर हे परिमाण लागू नसतं. या इंजिनात थ्रस्टची मोजणी होते.
जिथं कारच्या इंजिनाची क्षमता सीसीमध्ये मोजली जाते तिथं जेट विमानाच्या इंजिनाच्या मोजणीत थ्रस्ट आणि पॉवरच्या निकषांवर मोजली जाते.
मायलेज सांगावं, तर जेट प्लेनचं मायलेज फार नसतं. उदाहरणार्थ, बोईंग 747 चं इंजिन सरासरी 0.2 ते 0.3 किमी इतकं आहे.
मोठ्य़ा विमानांमध्ये इंधनाची खपत जास्त होते. Boeing 747 जवळपास 12 लीटर प्रति सेकंद इंधन वापरतं. म्हणजेच एका उड्डाणासाठी हजालो लीटर इंधनाची खपत.
जेट विमानाच्या इंजिनावला जेट इंजिन असंही म्हणतात. हे इंजिन न्यूटनच्या तिसऱ्या सिद्धांतावर काम करतं. 'प्रत्येक क्रियेला समान आणि विपरित प्रतिक्रिया असते' हाच तो सिद्धांत.
Intake, Compressor, Combustion, Turbine आणि Exhaust या जेट इंजिनच्या कार्यक्षमतेतील महत्त्वाच्या पायऱ्या आहेत.