सरकारने जारी केला अलर्ट, तात्काळ करा 'ही' कामं अन्यथा बँक खातं होईल रिकामी
Feb 11,2024
लॅपटॉप म्हटलं की त्यात बँक व्यवहारापासून ते अनेक महत्वाचा डेटा, फाईल्स त्यात असतात. यात फोटो आणि व्हिडीओही असतात.
त्यामुळे लॅपटॉप हॅक झाला तर किती मोठं संकट येऊ शकतं याची कल्पना करा. दरम्यान सरकारने बँक खात्यासंबंधी अलर्ट जारी केला आहे.
भारत सरकारची एजन्सी कॉम्प्यूटर एजन्सी रिस्पॉन्स टीमने (CERT-IN) एक इशारा दिला आहे. हा अलर्ट Google Chrome OS संबंधी आहे.
CERT-IN ला Chrome OS मध्ये असुरक्षितता आढळली आहे. 8 जानेवारीला हे सेक्युरिटी अलर्ट जारी केला आहे.
CERT-IN ने सांगितलं आहे की, Google Chrome OS मध्ये असुरक्षित गोष्टी आढळल्या आहेत. याच्या आधारे सायबर क्रिमिनल्स तुमच्या डिव्हाइसमध्ये घुसखोरी करु शकतात.
सायबर क्रिमिनल्स तुमच्या लॅपटॉपचा रिमोट अॅक्सेस घेऊ शकतात. यानंतर तुमच्या बँक खात्याची माहिती मिळवत खातं रिकामी करु शकतात.
डिव्हाइस अपडेट करा
CERT-IN ने या हल्ल्यापासून डिव्हाइस वाचवण्यासाठी ते अपडेट करण्याचा सल्ला दिला आहे. युजर्स आपल्या Chrome OS ला व्हर्जन 114.0.5735.350 किंवा त्याच्यानंतरच्या व्हर्जनमध्ये अपडेट करु शकतात.
डिव्हाइसला अशा हल्ल्यांपासून वाचवण्यासाठी सतत अपडेट करा. कंपनीने नेहमी नवे अपेडट जारी करत असतं, त्याकडे दुर्लक्ष करु नका.
अज्ञात व्यक्ती किंवा सोर्सकडून येणाऱ्या लिंकवर क्लिक करु नका. ही लिंक तुमच्या डिव्हाइसमध्ये घुसखोरी करु शकतात.