व्हॉट्सअॅपने एक नवीन फीचर आणले आहे. यामध्ये सेंटिग ऑन केल्यानंतर व्हॉट्सअॅप चॅट लॉक करता येणार आहे.
या चॅट लॉक फिचरच्या मदतीने चॅट लॉक करता येतील. तसेच या चॅट लॉकच्या मदतीने तुम्ही तुमचे चॅट लपवू देखील शकता.
जर तुम्हाला तुमचे चॅट लॉक करायचे असतील तर काही सोप्या टिप्स फॉलो कराव्या लागतील.
यासाठी तुम्हाला चॅट सुरक्षित ठेवण्यासाठी ज्या चॅटला लॉक करायचे आहे त्या नंबरवर क्लिक करा.
चॅट उघडल्यानंतर तुम्हाला वरच्या उजव्या बाजूला असलेल्या तीन डॉटवर क्लिक करावे लागेल. त्यानंतर View Contact वर क्लिक करा. त्यानंतर स्क्रोल करा तुम्हाला Chat Lock चा पर्याय दिसेल.
Chat Lock पर्यायावर क्लिक करताच तुम्हाला Continue हा पर्याय दिसेल. या पर्यायवर क्लिक केल्यानंतर तुम्ही फेस लॉक किंवा फिंगरप्रिंट लॉकच्या मदतीने चॅट लॉक करु शकता.
फिंगरप्रिंट सेन्सरच्या मदतीने चॅट लॉक करण्यासाठी सेन्सरवर क्लिक करावे लागेल. त्यानंतर चॅट लॉक होईल.
हे चॅट तुम्हाला चॅट लिस्टच्या लॉक (Lock) केलेल्या चॅट्समध्ये हे सापडेल. जेव्हा तुम्ही फिंगरप्रिंट सेन्सर किंवा फेस अनलॉकचा वापर करता तेव्हा लॉक केलेले चॅट ओपन होतील.