इन्स्टाग्राम युजर्सना धक्का! 'कॉपीराइट' नसतानाही तुमच्या जुन्या व्हिडीओतून...

Pravin Dabholkar
Dec 08,2023


Instagram Bug: इंस्टाग्राम यूजर्सना त्यांच्या अकाऊंटवर काही बदल झालेले दिसत आहेत पण असं का होतंय? हे कळायला काही मार्ग नाहीय.


इंस्टाग्राम व्हिडिओंचा ऑडिओ आपोआप गायब होत असल्याची तक्रार युजर्स करत आहेत. ऑडिओ गायब का होत आहेत? याबद्दल यूजर्सना कोणतीही माहिती समोर आली नाही.


एरवी जेव्हा इंस्टाग्राम किंवा फेसबुकवरील व्हिडिओंमध्ये ऑडिओ म्यूट केला जातो तेव्हा यूजर्सना याबद्दल माहिती दिली जाते. आतापर्यंत ज्या युजर्सनी 2014 च्या आसपास त्यांचे व्हिडिओ इंस्टाग्रामवर अपलोड केले होते, त्यांनाच ही समस्या भेडसावत होती.


बऱ्याचदा कॉपीराइटमुळे व्हिडीओतून म्युझिक गायब होतात. पण आता ज्या व्हिडीओमधून ऑडिओ गायब झाला आहे ते कॉपीराईटमुळे आलेले नसल्याचं बोललं जात आहे.


जेव्हा कॉपीराइटमुळे समस्या उद्धवते तेव्हा इन्स्टाग्राम आपल्या यूजर्सना मेल किंवा अॅपद्वारे अलर्ट पाठवते. पण यावेळी यूजर्सना कोणत्याही प्रकारची माहिती देण्यात आली नाही.


इंस्‍टाग्रामने त्‍याच्‍या प्‍लॅटफॉर्मवर व्हिडिओ फिचर जून 2013 मध्‍ये सुरू केले होते.


जून 2013 ते ऑक्टोबर 2014 दरम्यान अपलोड केलेल्या व्हिडिओंमधून ऑडिओ गायब असल्याचे द व्हर्जच्या अहवालात म्हटले आहे. या व्हिडिओमध्ये आवाज नाही, असे कॅप्शन येत आहे.

VIEW ALL

Read Next Story