जगात अशी एक कार आहे तिचा वेग हा जपानच्या बुलेट ट्रेन पेक्षाही जास्त आहे.
जगातील सर्वात वेगवान धावणाऱ्या या कारचे नाव Koenigsegg Jesko Absolut आहे.
जपानच्या बुलेट ट्रेनचा वेग ताशी 320 किमी आहे. तर या कारचा वेग हा सुमारे 531 किमी आहे.
दिल्ली ते मुंबई हे अंतर 1436 किलोमीटर आहे. हे अंतर रस्त्याने कापण्यासाठी 20 तासांपेक्षा जास्त वेळ लागतो.
जर हे अंतर या कारने कापले तर हा प्रवास अवघ्या तीन तासांमध्ये पूर्ण होऊ शकतो.
जगातील या सर्वात वेगवान कारने अवघ्या एका दिवसात चार विक्रम केले आहेत. या कारने वेग आणि कामगिरीमध्ये चारही रेकॉर्ड दिले आहेत.
ही कारचे इंजिन 9-स्पीड ट्रान्समिशनने सुसज्ज आहे. जे खूप वेगाने धावण्यास मदत करते. या कारचे 125 मॉडेल बनवले गेले होते. जे सर्व विकले गेले आहेत. ही कार 3 दशलक्ष डॉलर्सला विकली गेली आहे.