ओला इलेक्ट्रिककडे अशी एक उत्तम बाईक आहे. जी 500 किलोमीटरपेक्षा जास्त अंतर पार करते.
ओलाच्या या इलेक्ट्रिक बाईकचे नाव Ola Roadster X Plus आहे. या बाईकची किंमत किती? जाणून घेऊयात सविस्तर
Ola च्या 4.5kWh व्हेरिएंट बाईकची एक्स शोरुम किंमत 1,04,999 लाख रुपये इतकी आहे. तर 9.1kWh या व्हेरिएंटची किंमत 1,54,999 लाख रुपये इतकी आहे.
ओलाची 9.1kWh ही इलेक्ट्रिक बाईक फूल चार्जमध्ये 501 किलोमीटर जाते. या बाईकचा स्पीड 125 किलोमीटर प्रतितास आहे.
कंपनीच्या वेबसाईटनुसार, ही बाईक महिन्याला 500 रुपयांच्या किमतीत चालवता येते. ज्यामध्ये दररोज 80 किमी प्रवास आणि प्रति युनिट 7 रुपये वीज खर्चाच्या आधारे केली गेली आहे.
या बाईकमध्ये 9.1 किलोवॅट क्षमतेची बॅटरी आहे. तिला पूर्ण चार्ज होण्यासाठी 8 तास लागतात.