व्हॉट्सअॅपने आपल्या युजर्सना गुड न्यूज दिली आहे. आता व्हॉट्सअॅपवर तुम्ही इतरांना एचडी क्वालिटीमध्ये कोणताही फोटो पाठवू शकता.
व्हॉट्सअॅप फोटो शेअरिंगसाठी एक मोठे अपडेट दिले आहे.
फोटो अपलोड करता तेव्हा बाजूला पेन आणि क्रॉप टूल असते. त्याच बरोबरीने एक HD पर्याय असेल.
यावर क्लिक करून तुम्ही HD मध्ये फोटो पाठवू शकाल.
तुमच्याकडे कमी बँडविड्थ कनेक्टिव्हिटी असताना तुम्हाला फोटो पाठवायचा असेल तर तुम्ही कोणता फोटो कोणत्या व्हर्जनमध्ये ठेवू इच्छिता ते निवडू शकता.
एचडी फोटो अपडेट येत्या काही आठवड्यांत जागतिक स्तरावर उपलब्ध होईल. तसंच हे फोटोही एंड-टू-एंड एन्क्रिप्टेड असतील.
यूजर्सना एचडी (2000x3000 पिक्सेल किंवा 1365x2048 पिक्सेल) क्वॉलिटीत फोटो पाठवता येणार आहे.
मेटा सीईओ मार्क झुकेरबर्ग यांनी फेसबुकवरील पोस्टमध्ये ही माहिती दिली.