57 किलो वजन कमी केलं

एका फास्ट फूड लव्हरने आपण आपल्या आवडीचे सर्व पदार्थ खाऊनही 57 किलो वजन कमी केल्याचा दावा केला आहे.

Aug 10,2023

अमेरिकेत वास्तव्यास

क्रिस टेरेल असं या व्यक्तीचं नाव आहे. तो अमेरिकेत वास्तव्यास आहे.

फक्त कॅलरीवर लक्ष्य

क्रिस टेरेलचं म्हणणं आहे की, त्याने कोणतंही स्ट्रिक्ट डायटिंग केलं नाही. फक्त खाताना कॅलरीचं मोजमाप केलं आणि वजन कमी झालं.

"आवडते पदार्थ खाणं सोडलं नाही"

क्रिसचं म्हणणं आहे की, "मी जे हवं ते खाऊ शकतो, पण कॅलरी मोजल्यानंतरच...मी कधीही आपले आवडते पदार्थ खाणं सोडलं नाही".

"भूक नसेल तेव्हा काहीच खायचं नाही"

क्रिसने सांगितलं की, "मला जेव्हा भूक नसायची, तेव्हा मी काहीच खात नसे. जेव्हा भूक लागायची तेव्हाच खायचो. यामुळे मला कमी कॅलरीज खाण्यात मदत मिळाली".

पोट भरलं की खाणं बंद

क्रिस जंक फूड आणि प्रोसेस्ड फूडही खात होता, पण त्याचं प्रमाण कमी होतं. तो फार हळू हळू खायचा आणि जेव्हा पोट भरायचं तेव्हा खाणं बंद करायचा.

ताटातच कमी जेवण घ्या

क्रिस घेतानाच कमी जेवण घेत असे. याचं पोट भरलं आहे हे समजण्यासाठी मेंदूला 20 ते 30 मिनिटांचा वेळ लागतो.

प्रत्येक घासाआधी 15 सेकंद थांबा

म्हणजेच जर तुम्हाला जेवणाचा आनंद घ्यायचा असेल आणि अधिक प्रमाणात खाणं टाळायचं असेल तर हळू हळू खावा. तसंच प्रत्येक घासाआधी 15 सेकंद थांबा.

जवळपास 57 किलो वजन घटवलं

क्रिसचं वजन जवळपास 57 किलो कमी झालं आहे. तो आठवड्यातून अनेकदा पिझ्झा, बर्गर, सँडविच आणि आपल्या आवडत्या गोष्टी खात असे.

रोजचा आहार काय?

क्रिस रोज 2 बेकन, अंडी आणि पनीर बिस्किट खायचा ज्यामध्ये 900 कॅलरी असतात. एक चिकन मॅकग्रिडल खात असे ज्यामध्ये 390 कॅलरी असते.

VIEW ALL

Read Next Story