एका फास्ट फूड लव्हरने आपण आपल्या आवडीचे सर्व पदार्थ खाऊनही 57 किलो वजन कमी केल्याचा दावा केला आहे.
क्रिस टेरेल असं या व्यक्तीचं नाव आहे. तो अमेरिकेत वास्तव्यास आहे.
क्रिस टेरेलचं म्हणणं आहे की, त्याने कोणतंही स्ट्रिक्ट डायटिंग केलं नाही. फक्त खाताना कॅलरीचं मोजमाप केलं आणि वजन कमी झालं.
क्रिसचं म्हणणं आहे की, "मी जे हवं ते खाऊ शकतो, पण कॅलरी मोजल्यानंतरच...मी कधीही आपले आवडते पदार्थ खाणं सोडलं नाही".
क्रिसने सांगितलं की, "मला जेव्हा भूक नसायची, तेव्हा मी काहीच खात नसे. जेव्हा भूक लागायची तेव्हाच खायचो. यामुळे मला कमी कॅलरीज खाण्यात मदत मिळाली".
क्रिस जंक फूड आणि प्रोसेस्ड फूडही खात होता, पण त्याचं प्रमाण कमी होतं. तो फार हळू हळू खायचा आणि जेव्हा पोट भरायचं तेव्हा खाणं बंद करायचा.
क्रिस घेतानाच कमी जेवण घेत असे. याचं पोट भरलं आहे हे समजण्यासाठी मेंदूला 20 ते 30 मिनिटांचा वेळ लागतो.
म्हणजेच जर तुम्हाला जेवणाचा आनंद घ्यायचा असेल आणि अधिक प्रमाणात खाणं टाळायचं असेल तर हळू हळू खावा. तसंच प्रत्येक घासाआधी 15 सेकंद थांबा.
क्रिसचं वजन जवळपास 57 किलो कमी झालं आहे. तो आठवड्यातून अनेकदा पिझ्झा, बर्गर, सँडविच आणि आपल्या आवडत्या गोष्टी खात असे.
क्रिस रोज 2 बेकन, अंडी आणि पनीर बिस्किट खायचा ज्यामध्ये 900 कॅलरी असतात. एक चिकन मॅकग्रिडल खात असे ज्यामध्ये 390 कॅलरी असते.