कमालच म्हणावी ना या नेलपॉलिशची...?
गंमत म्हणजे, या नेलपॉलिशच्या किंमतीमध्ये तीन Audi A4 कार विकत घेता येतील. आतापर्यंत फक्त 25 जणांनीच ही नेलपॉलिश खरेदी केली आहे.
Azature च्या काळ्या रंगाच्या नेलपॉलिशमध्ये 267 कॅरेटच्या काळ्या आणि तितक्याच मौल्यवान हिऱ्याचा वापर केला गेला आहे. ज्यामुळं ती कोट्यवधींना विकली जातेय.
Azature Pogosian नं यापूर्वीही अशा अनेक नेलपॉलिश तयार केल्या आहेत. पण, या ब्रँडची काळ्या रंगाची नेलपॉलिश म्हणजे जणू एक आश्चर्यच.
अजाटूर (Azature) असं या नेलपॉलिशच्या ब्रँडचं नाव. लॉस एन्जेलिसच्या Azature Pogosian या डिझायनरच्या नावावरून हे नाव मिळालं आहे.
जाणून आश्चर्य वाटेल पण, जगात एक अशी नेलपॉलिश आहे जी 2.5 लाख डॉलर म्हणजेच साधारण 2.05 कोटी रुपये इतक्या किमतीची आहे.